इंशाअल्लाह एक दिवस हिजाब घालणारी पंतप्रधान होईल- ओवेसी

कर्नाटक- कर्नाटकातील हिजाब वाद आता राजकारणाचा विषय ठरला आहे. अनेक राज्यात आणि देशात या वादाचे पडसाद उमटतांना दिसून येत आहेत. यातच पाच राज्याच्या निवडणूका होत असताना असा मुद्दा येण म्हणजे राजकीय नेत्यांना आयत कुलीत मिळाल्या सारख आहे. यावरच एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा अअसदुद्दीन ओवेसी यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमुळे आता नवीन वाद सुरु होईला का असा सवाल निर्माण केला जात आहे.

ओवेसी काय म्हणाले –
म्हणाले ओवेसी म्हणाले की, आमची मुलगी तिच्या पालकांना सांगेल, मला हिजाब घालायचा आहे. हिजाब घालून आमची मुलगी डॉक्टर बनेल, कलेक्टर बनेल आणि बिझनेसवुमनही बनेल, एसडीएमही बनेल, इंशाअल्लाह एक दिवस हिजाब घालणारी पंतप्रधान बनेल, असे ओवेसी यांनी म्हंटले आहे. मी हे बघण्यासाठी हयात नसेन की नसेन माहित नाही पण मला विश्वास आहे एक दिसव असा नक्की येईल.

 

नेमकं प्रकरण काय?
कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब (हेडस्कार्फ)वरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या मुस्लीम विद्यार्थिनींना सातत्याने महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात येत आहे. कर्नाटक राज्य सरकारने जारी केलेल्या ड्रेस कोडबाबतच्या नियमानुसार हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा कडक आदेश महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी देऊनही काही मुस्लीम विद्यार्थिनी आपल्या पालकांसह महाविद्यालयात आल्या असता त्यांना महाविद्यालयीन परिसराच्या बाहेर उभे करण्यात आले. त्यामुळे मुलींसह त्यांच्या पालकांनीही गेटबाहेर निदर्शने केली. त्याचवेळी या मुलींचा निषेध करण्यासाठी काही हिंदू विद्यार्थी भगवे उपरणे घालून महाविद्यालयाच्या परिसरात फिरत होते. त्यामुळे हा विषय अधिकच चिघळला.

Share