मुंबई मनापाच्या बजेटला लूटून नेण्याचा प्रयत्न – फडणवीस

मुंबई : देवेंद्र फडणवीसांनी आज विधीमंडळामध्ये मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचा पाढा वाचून दाखवला. येत्या काही महिन्यांमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज फडणवीसांनी मुंबई महापालिकेच्या कारभावर टिका करत शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. फडणवीसांनी म्हटलं की, मुंबई महापालिकेत प्रचंड भ्रष्टाचार असून पालिकेला सोन्याचं अंड देणारी कोंंबडी समजत आहेत. मुंबईला देण्याऐवजी लूटण्याच काम सुरु केल आहे.

पुढे बोलतांना म्हणाले की, कोरोना काळात काढलेल्या सर्व कंत्राटात घोटाळे झाले आहेत. नालेसफाई घोटाळा, रस्ते चर भरण्यात घोटाळा, टॅब खरेदीत घोटाळा, कोविड सेंटरमध्ये घोटाळा, सामग्री घोटाळा, पदाधिकारी काम दिले, आश्रय घोटाळा, पेंग्विन घोटाळ, उद्यान विकास घोटाळ, बेस्ट तिकिट निविदा घोटाळा अशी परिस्थिती मुंबई महापालिकेत आहे. मुंबई मेली करी चालेल पण आपलं घरं भरलं पाहिजे अशी वृत्ती आहे. मात्र, यावर आम्ही बोलतो तर आम्ही शत्रू ठरतो.

पुढे फडणवीसांनी सवाल केला की, मुंबईत मराठी माणसाला लूटून खाणारे दैवत का? मुंबईचा मराठी असो की अमराठी असो, प्रत्येकाला कळलंय की प्रेताच्या टाळू वर लोणी कोणी खाल्ल आहे. मात्र घोटाळ्याविरोधात आम्ही बोलले तर आम्हाला शत्रू ठरवतात. मुंबई महापालिकेत प्रचंड भ्रष्टाचार असून पालिकेला सोन्याचं अंडं देणारी कोंबडी समजत आहेत असेही फडणवीसांनी विचारले.

Share