राज्यावर वीज कपातीचे मोठे संकट, ऊर्जामंत्र्यांचे स्पष्टीकरण

औरंगाबाद : राज्यावर सध्या वीजेच  मोठ संकट येऊन ठेपल आहे. सध्या राज्यात दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे. तर तीन दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कोळसा उपलब्ध करून द्यावा, अन्यथा राज्यावर मोठ वीज संकट कोसळेल अशी माहिती आज ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी दिली आहे.

राज्यात वीज कपातीचे संकट असताना उन्हामुळे वीजेचा वापर जास्त प्रमाणात होत आहे.  त्यामुळे ही परिस्थिती आणखीनच बिकट होत चालली आहे. त्यामुळे केंद्राने आता राज्याला कोळसा उपलब्ध करून द्यावा नाहीतर ऐन सणासुदीच्या  काळात राज्य अंधारात जाईल. अशी शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

Share