बिपाशा आणि करणनं चाहत्यांना दिली गूड-न्यूज

मुंबई : सध्या बाॅलिवूडमध्ये गुड न्युजचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. अभिनेत्री आलिया भट्टने चाहत्यांना आनंदाची बातमी दिल्यानंतर अभिनेत्री बिपाशा बासू आणि अभिनेता करण सिंह ग्रोवर यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याच्या गेल्या काही दिवसांपासून फक्त चर्चा होत्या. पण आता यावर शिक्कामोर्तब झाला आहे. बिपाशाने गरोदरपणातील फोटो शेअर करत आपण आई होणार असल्याचं सांगितलं आहे.

बिपाशाची पोस्ट
‘आमच्या आयुष्याच्या विविध छटांमध्ये एक नवीन वेळ, एक नवीन टप्पा, एक नवीन प्रकाश रेखाटला गेला आहे. त्यामुळे आम्हाला पूर्वीपेक्षा थोडं अधिक पूर्णत्वाची भावना अनुभवायला मिळतेय. आम्ही या आयुष्याची सुरुवात वैयक्तिकरित्या केली आणि नंतर आम्ही एकमेकांना भेटलो. तेव्हापासून आम्ही दोघं या प्रवासात एकत्र आहोत. फक्त दोघांपुरतं हे प्रेम मर्यादित ठेवणं आम्हाला थोडं अयोग्य वाटलं. त्यामुळे आता आता लवकरच आम्ही दोघाचे तीन होऊ. आमचं बाळ लवकरच आमच्या या प्रवासाचा साथीदार होईल आणि आमचा द्विगुणीत करेल. तुम्हा सर्वांच्या बिनशर्त प्रेमाबद्दल, तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद आणि ते नेहमीच आमचा एक भाग असतील,’ अशा शब्दांत बिपाशाने भावना व्यक्त केल्या आहेत.

बिपाशा आणि करणची लव्ह स्टोरी 
बिपाशा आणि करणची पहिली भेट एका चित्रपटाच्या सेटवर झाली. हे दोघे एकमेकांना काही वर्ष डेट करत होते. त्यानंतर २०१६ मध्ये दोघांनी लग्न केलं. आता लग्नानंतर सहा वर्षांनी करण आणि बिपाशा आई-बाबा होणार आहेत. धूम २, फिर हेरा फेरी,नो एन्ट्री, मेरे यार की शादी है या चित्रपटांमध्ये बिपाशानं काम केलं आहे. तर करणनं  कुबूल है,  दिल मिल गए,  दिल दोस्ती डान्स या मालिकेमध्ये काम केलं आहे.

Share