अभिनेत्री शबाना आझमी यांना कोरोनाची लागण

मुंबई :  बॉलिबूडची अभिनेत्री काजोला कोरोना पॉझिटिव्ह आलाची बातमी ताजी असताना आता अभिनेत्री शबाना आझमी कोरोना पाॅझिटिव्ह आली असल्याची माहिती आज सकाळी सोशल मीडियावर दिली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली जात असल्याचं सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shabana Azmi (@azmishabana18)

शबाना आझमींनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून सांगितलंय की, त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून स्वतःला त्यांनी आयसोलेशन केलय. स्वतःचा एक फोटो शेअर करत त्यांनी लिहिलंय की, आज माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी स्वतःला वेगळं केलंय. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी त्यांची कोविड तपासणी करून घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलंय. या पोस्टनंतर त्यांचे चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत.

Share