औरंगाबाद : शहरातील सिद्धार्थ उद्यान लहान मुलांसाठी आकर्षणाच केंद्र आहे. महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान-प्राणिसंग्रहालयाला दरवर्षी मराठवाड्यासह विदर्भ, खानदेशातील हजारो पर्यटक भेटी देतात. त्यात सहलींचा देखील समावेश असतो. त्यामुळे महापालिकेने सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालय अधिक आकर्षित करण्यासाठी पावले उचलली आहेत. स्मार्ट सिटी अभियानातून काही महिन्यांपूर्वी याठिकाणी सुपर हिरोचे पुतळे लावले आहेत. हे पुतळे लहान मुलांचे आकर्षण ठरले आहेत.
सिद्धार्थ उद्यान-प्राणिसंग्रहालयात येणाऱ्या बाल पर्यटकांना आता वॉटर बोटींचा आनंद लुटता येणार आहे. १५ मेपासून ही सुविधा उद्यानात असेल. त्यासाठी ५० रुपये तिकीट आकारले जाणार आहे. तुळजाई एन्टरप्रायजेसतर्फे हा प्रकल्प सुरू केला जाणार असून, दहा वर्षासाठी प्रशासनाने करार केला आहे.पाच ते १२ वयोगटातील मुलांच्या मनोरंजनासाठी मुव्हेबल रबर वॉटर टँकमधील वॉटर बोट व इतर खेळणी उभारण आहे.