रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीत मुंबई पोलिस आयुक्तांची हजेरी

मुंबई : रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीत मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी हजेरी लावली होती. यावरून आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पोलिस आयुक्त संजय पांडे यांचा इफ्तार पार्टीत सहभागी झाल्याचा एक फोटो शेअर करत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. आ. राणे यांनी महाविकास आघाडीवरही निशाणा साधला आहे.

ज्या रझा अकादमीने आझाद मैदानात अमर जवान स्तंभ तोडला व महिला पोलिस भगिनींशी गैरवर्तन केले अशा देशविरोधी कृती करणाऱ्यांच्या इफ्तारमध्ये सामील होऊन, त्यांना अधिकृतरित्या प्रोत्साहित करणे हे महाविकास आघाडीचे धोरण राबविण्याचा अधिकाऱ्यांवरती दबाव आहे का? असा सवाल आ. नितेश राणे यांनी केला आहे. आ. नितेश राणे यांनी ट्वीटरवर व्हिडीओद्वारे म्हटले आहे की, “काल मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीला उपस्थित होते. ही रझा अकादमी नेमकी काय आहे? तर, जिने आझाद मैदानावरील अमर जवान स्तंभाची मोडतोड केली आणि त्यानंतर महिला पोलिसांना मारहाण आणि अत्याचार केले. ही रझा अकादमी म्हणजे तीच जिने सतत देशविरोधी भूमिका घेतलेल्या आहेत.”

https://twitter.com/NiteshNRane/status/1515939391797030913?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1515939391797030913%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmaharashtra%2Fnitesh-ranes-target-on-the-iftar-party-of-raza-academy-in-the-presence-of-mumbai-police-commissioner-msr-87-2892299%2F

“हीच ती रझा अकादमी आहे जिने भिवंडीत काढलेल्या मोर्चात दोन पोलिस अधिकारी मारले गेले. हीच ती रझा अकादमी जिने अशाताच झालेल्या नांदेड, अमरावती, मालेगावमध्ये दंगल घडवण्यात पुढाकार घेतला आणि त्या दंगलीत, मोर्चांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पोलिसांवर अत्याचार केले”, असे नितेश राणेंनी म्हटले आहे.

महाविकास आघाडीवरही साधला निशाणा

“एका बाजूला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आम्हाला सभागृहात सांगतात की, रझा अकादमीवर बंदी घालण्याचा आम्ही विचार करतोय आणि दुसऱ्या बाजूला त्यांचेच पोलिस अधिकारी जर यांच्याबरोबर इफ्तार पार्टी करत असतील, तर महाविकास आघाडीचा अधिकाऱ्यांना दिलेला हा सरकारी आदेश तर नाही ना? हा प्रश्न मला या निमित्ताने विचारायचा आहे”, अशा शब्दांमध्ये आ. नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

https://twitter.com/NiteshNRane/status/1515887064663064576?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1515887064663064576%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fnews%2Fmumbai%2Fnitesh-rane-tweet-on-raza-academy-rane-allegation-on-mumbai-police-commissioner-sanjay-panday-maha-vikas-aghadi-1051491

Share