टॅक्स कपातीनंतर कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, काय आहे आजचा भाव

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. पेट्रोल डिझेलच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. गेल्या आठवड्यात केंद्राकडून पेट्रोल आणि डिझेलवर लावण्यात येणाऱ्या अबकारी करात कपात केल्याने पेट्रोल ८ रुपये आणि डिझेलच्या दरात ६ रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे महागाईत भरडल्या जाणाऱ्या जनतेला दिलासा मिळत आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी आज सकाळी नवे दर जारी केले. यात कोणताही बगल करण्यात आलेला नाही. जागतिक बाजारात कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे कंपन्यांवर किरकोळ किमतीत वाढ करण्याचा दबाव दिसून येत आहे. जाणकारांनी या आधी जर जर कच्च्या तेलाचा भाव ११० डॉलरहून वर गेल्यास पेट्रोल-डिझेल दर पुन्हा वाढू शकतो असं म्हटलं होतं.

राज्यातील प्रमुख शहरातील दर 

मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर १११.३५ रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर ९७.२८ रुपये इतका आहे. उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर १११.४१  रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर ९५.९२ रुपये इतका आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर १११.२५ रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर ९५.७३रुपये इतका आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर ११२.९७ रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर ९८.८९ रुपये एवढा आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर १११.०२ रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर ९५.५४ इतका आहे. ठाण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर ११०.७८ रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर ९५.२५ रुपये इतका आहे.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकरे तपासा

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

आजचे पेट्रोल-डिझेलचे दर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून देखील जाणून घेऊ शकताय. SMS च्या माध्यमातून देखील तुम्हाला नेहमीचे दर कळू शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून ९२२४९९२२४९ या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे.

Share