काॅंग्रेस नेते जिग्नेश मेवाणी यांना अटक

अहमदाबाद : गुजरातचे काॅंग्रेस नेते व आमदार जिग्नेश मेवाणी यांना आसाम पोलिसांनी काल रात्री उशिरा गुजरातच्या पालनपूर येथील विश्रामगृहातून अटक केली. यानंतर त्यांना अहमदाबाद येथे नेण्यात आले. या कारवाईचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.

२०२१ मध्ये जिग्नेश मेवाणी यांनी काॅंग्रेसचा प्रचार केला हाेता. जिग्नेश मेवाणी यांचे ट्विट्स मागील काही दिवसांपासून थांबविण्यात आले आहेत. अटकेनंतरही त्यांना ट्विट करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जिग्नेश मेवाणींच्या सहकाऱ्यांचे म्हणणे असे आहे की, अटक करताना पोलिसांनी गुन्‍हा दाखल झालेली कागदपत्रे दाखवलेली नाहीत. आता आसाम पोलिस त्‍यांना गुवाहाटी येथे घेऊन जाण्याच्या तयारीत आहेत.

जिग्नेश मेवाणी हे गुजरात विधानसभेचे सदस्य आहेत. गुजरातच्या वडगाम मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून विजय मिळविल्यानंतर त्‍यांनी काॅंग्रेसला पाठिंबा दिला. यानंतर त्‍यांनी काँग्रेसमध्‍ये प्रवेश केला हाेता.

Share