क्रिकेटर सुरेश रैनाच्या वडिलांचं गाझियाबाद येथे निधन

दिल्ली- भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या वडिलांचे निधन झाले आहे. रैनाचे वडील त्रिलोक चंद रैना यांचे आज रविवारी सकाळी निधन झाले. ते दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज देत होते. गाझियाबाद येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.त्रिलोकचंद रैना हे लष्करात अधिकारी होते.

त्यांच्या निधनाने क्रिकेट जगताला दु:खी आहे. त्रिलोक चंद रैना हे भारतीय लष्करात कार्यरत होते. त्यांचे मूळ गाव जम्मू-काश्मीर प्रदेशातील रैनावरी आहे. १९९०च्या दशकात काश्मिरी पंडितांच्या हत्येनंतर रैनाच्या वडिलांनी गाव सोडले होते. यानंतर त्रिलोकचंद रैना गाझियाबादमधील मुरादनगर येथे स्थायिक झाले.

Share