उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : काही दिवसांपूर्वी ‘नीट’ आणि ‘जेईई’ परीक्षांच्या तारखांचा विचार करून एमएचटी-सीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून घेतल्या जाणाऱ्या एमएचटी-सीईटी परीक्षेच्या तारखा आता जाहीर करण्यात आल्या आहेत. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. एमएचटी-सीईटी परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता वेळापत्रक जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी राज्य सीईटी कक्षामार्फत उच्च शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा जून महिन्यात होणार होत्या. मात्र, ‘जेईई’ आणि ‘नीट’ परीक्षांमुळे सीईटी परीक्षा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. राज्य सीईटी कक्षामार्फत उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक http://mahacet.org या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

https://twitter.com/samant_uday/status/1521033316773756929?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1521033316773756929%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Feducation-jobs%2Fcet-exam-latest-update-time-table-declared-by-department-of-higher-and-technical-education-sbk97

Share