जम्बो कोव्हिड सेंटरप्रकरणी उपमुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

पुणे :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे नेते सोमय्या यांना दिले सडेतोर उत्तर. पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा दावा किरीट सोमय्या त्यांनी केला आहे. यावर आता अजित पवार यांनी पुण्याच्या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये कोणताही भ्रष्टाचार झाला नाही. किंबहूना या सेंटरच्या कामात कोणताही राजकीय सहभाग नव्हता, असा दावा केला आहे. अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

अजित पवार यांनी आज पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत पहिला विषय जम्बो कोविड सेंटरचा निघाला. त्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. त्यानुसार या सेंटरच्या उभारणीत कोणताही घोटाळा झाला नाही. पारदर्शक काम झाले आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

जम्बो हॉस्पिटलच्या कामात राज्य सरकार आणि जिल्हा वार्षिक योजना आणि पालिकेचा हिस्सा असतो. सीओपीच्या मैदानावर आणि दुसऱ्या एका ठिकाणी दोन कोव्हिड सेंटर उभे करण्यात आले. त्यात राजकीय पदाधिकाऱ्यांना सहभागी करून घेतलं नव्हतं. पीएमसी कमिश्नर विक्रम कुमार, पीसीएमसी कमिशनर राजेश पाटील, जिल्हाधिकारी, पीएमआरडीए कमिश्नर सुहास दिवसे आणि सीईओ जिल्हा परिषद आदींचा या कामात सहभाग होता. त्यांना पारदर्शकपणे काम करण्यास सांगितलं होते. आजच्या मिटिंगमध्ये हाच विषय पहिला घेतला. या बैठकीत सर्व माहिती मिळाली. ती समजून घेतली. त्यासंदर्भात एक नोट तयार करण्यास सांगितलं आहे. ती नोट मीडियालाही देऊ. मात्र, या कोव्हिड सेंटरमध्ये काही चुकीचे झाले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Share