बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्ने देवेंद्र फडणवीस पूर्ण करतील, नितेश राणेंनी व्यक्त केला विश्वास

उस्मानाबाद- भाजप आमदार नितेश राणे हे सह कुटुंब तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आले असा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टिका करत बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्ने देवेंद्र फडणवीस पूर्ण करतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

आमदार राणे म्हणाले की, राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार हेच नागरिकांसाठी संकट आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्ने देवेंद्र फडणवीस पूर्ण करतील असेही त्यांनी सांगितले. उस्मानाबाद, औरंगाबाद येथील नामकरण करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नशीबात नाही. यावेळी तुळजा भवानी मंदीर समितीच्या वतीने तहसीलदार सौदागर तांदळे, तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, सचिन पाटील यांच्या वतीने श्री राणे यांचा सत्कार करण्यात आला. राणे यांचे फटाके फोडून येथे कार्यकर्त्यांनी स्वागत केले.

शिवसेनेने हिंदुत्व सोडून दिले आहे. त्यांच्या राज्यात हिंदूंच्या सण-उत्सवांवर निर्बंध लादायचे आणि इतर धर्मियांच्या सणांना मोकळीक द्यायची. शिवसेनेच्या हिंदुत्वाची व्याख्या काय, हे ठाकरे यांनी सांगावे,अशा शब्दात राणे यांनी टोलेबाजी केली.

Share