देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाची जाहीरातबाजी नको, भाजपाकडून आवाहन

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने पक्षाचे कोणतेही नेते, कार्यकर्ते होर्डिंग, बॅनर लावणार नाहीत आणि वृत्तपत्रातून/ टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करु नये, असे आवाहन भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आल्याचे भाजपाचे कार्यालय सचिव मुकुंद कुळकर्णी यांनी सांगितलं आहे.

होर्डिंग, बॅनर, जाहिराती कुणी केल्यास त्याची पक्षातर्फे गंभीर दखल घेतली जाईल. त्यामुळे या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. यंदा कोरोनामुळे आपण सारेच अनेक संकटांना तोंड देत आहोत असे सचिव मुकुंद कुळकर्णी यांनी सांगितलं. भाजपातर्फे समाजातील विविध घटकांसाठी राज्यभर मोठ्या प्रमाणात सेवाकार्य केले जाते आहे. त्यामुळे ज्या कुणाला योगदान द्यायचे आहे, त्यांनी सेवाकार्यात योगदान द्यावे, असे आवाहन सुद्धा पक्षातर्फे करण्यात येत आहे.

दरम्यान अतिउत्साही कार्यकर्ते आणि नेत्यांना पक्षाने या सूचनेचे पालन न केल्यास कारवाईला सामोरे जावे लागण्याचा इशारा ही दिला आहे. होर्डिंग, बॅनर, जाहिराती असं कुणीही केल्यास त्याची पक्षातर्फे गंभीर दखल घेतली जाईल. त्यामुळे सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्यात यावं असं भाजपानं म्हटलं आहे. भाजपातर्फे समाजातील विविध घटकांसाठी राज्यभर मोठ्या प्रमाणात सेवाकार्य हाती घेण्यात आलं आहे. त्यामुळे ज्यांना योगदान द्यायचं आहे त्यांनी सेवाकार्यात योगदान द्यावं, असंही पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.

Share