‘आम्हाला हिंदुत्व शिकवू नका’, महापौर किशोरी पेडणेकर यांची भाजपावर टिका

मुंबईः मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर जोरदार हल्ला केला आहे. तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. हिंदुत्व हे तोंडाने बोंबलून सांगायचे नसते. हिंदुत्व हे मानणारे हिंदुत्व आहे. देश आणि मुंबईला अस्थिर करणारे हिंदुत्व नाही. हिंदुत्व हे स्थिर आहे. प्रत्येक धर्माचा आदर करावा हे आपल्याला आपल्या आईवडील आणि गुरुजणांनी शिकवलं आहे, अशा शब्दात किशोरी पेडणेकर यांनी भाजपावर हल्ला केला आहे.

दिशा सालियन प्रकरणावरही वक्तव्य
पेडणेकर यांनी दिशा सालियन प्रकरणावर बोलताना त्या म्हणाल्या की, मी सुद्धा एक आई आहे. त्यामुळे एखाद्या मुलीबाबत बातमी देताना काळजी घ्या. दिशा सालियनच्या आईनेही या संदर्भात माहिती दिली आहे. गेलेल्या मुलीचं चारित्र्यहनन करायला नको. दोषी असतील तर नक्की कारवाई होणार. पण गेलेल्या मुलीबद्दल इतकं नका बोलू. तिचे आई वडीलही इतकी विनंती करत आहेत, त्यांचं आपण ऐकलं पाहिजे. महिला आयोगाला जाऊन सांगायची गरज नाही. त्यांना मेलवर पत्र जाईल. रुपाली पाटणकर सक्षम आहेत. त्या नक्कीच चौकशी करतील. चौकशीनंतर सत्य बाहेर येईल. कारण नसतात त्या मुलीचं नाव घेऊन काही जण त्या मुलीच्या आई-वडिलांना यातना देत आहेत. असं करू नका, असं आवाहनही त्यांनी केलं

राणे पालिकेच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करतील
नारायण राणे यांच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेचं पथक काही पहिल्यांदा गेलेले नाही. यापूर्वीदेखील त्यांना नोटीस देण्यात आली होती. त्यांच्या घरी महापालिकेचं पथकही गेलेले आहे. त्यांनी केंद्र सरकारच्या सीआरझेड कायद्यालं उल्लंघन केल्याची तक्रार आहे, त्याच्याच तपासणीसाठी महापालिकचं पथक गेलं आहे. स्वतः राणे साहेबांनी सांगितले होते. काही पोर्शन अनधिकृत जाणवतोय, त्यामुळे हे पथक चौकशीसाठी आले होते. आताही हे पथक चौकशी करतंय. राणे साहेबही त्यांना सहकार्य करतील, अशी अपेक्षा आहे, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

Share