मासिक पाळित त्रास होतो करा हे उपाय

सर्व महिलांना मासिक पाळी येते. यावर सार्वजनिक रुपात चर्चा करणे त्या टाळतात.महिलांना मासिक पाळीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारींना सामोरे जावे लागते. कधी कधी काही महिन्यांपर्यंत पाळी न येणे तर कधी २१ दिवसांच्या अगोदरच रक्तस्राव सुरू होणे, अशा प्रकारच्या तक्रारी ना समोर जावे लागते. तसेच रक्तस्त्राव कमी जाण किवा जास्त जाण, पोटात दुखणे, कमर दुखणे अश्या प्रकारच्या अनेक त्रासाना महिलीना समोरे जावे लागते.हे सर्व हार्मोन्समध्ये झालेल्या बदलांमुळे होत असते. यावर तुम्ही काही घरगुती उपाय करून हा त्रास दूर करू शकता.

  • रात्रभर सफेद तीळ पाण्यात भिजवून ठेवा त्यानंतर हे पाणी दिवसातून दोन वेळा प्या.
  • जीऱ्याचे पाणी पिल्याने मासिक पाळी नियंत्रणात राहते. सोबतच त्यामुळे होणाऱ्या त्रासापासूनही आराम मिळतो. जिऱ्यांमध्ये असलेल्या लोहामुळे महिलांना मासिकपाळी दरम्यान होणारा त्रास कमी होतो. यासाठी एक चमचा जिऱ्यात एक चमचा मध मिसळून त्याचे दररोज सेवन करा.
  • कच्ची पपई खाल्लाने तुमच्या मासिक पाळी संदर्भात अनेक तक्रारी दूर होतील. यामध्ये भरपूर पोषण, अॅन्टीऑक्सिडंट असतात.
  • जास्वंदाचे फुल शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजिस्ट्रॉनला बॅलन्स करून मासिक पाळी नियमित करण्यास मदत करते.
  • तुळशीच्या पानांच्या रसात एक चमचा मध मिसळून घ्या. यामुळे मासिक पाळी नियमित होण्यास मदत होईल.
  • दररोज द्राक्षांचा रस पिल्याने तुम्हाला अनियमीत मासिक पाळीपासून सुटका मिळेल.
  • धने किंवा बडिशेपच्या दाण्यांचा काढा दिवसातून एकदा घ्या. धने किंवा बडिशेप रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी हे पाणी प्या. यामुळेही तुमचा त्रास दूर होईल.
  • मासिक पाळीदरम्यान रक्तस्त्राव व्यवस्थित होत नसेल तर अर्धा चमचा हिंग एक कप पाण्यात घालून दिवसातून दोन वेळा घ्यावा.
  • कच्चा कांदा खाल्ल्याने रक्तस्त्राव साफ होतो आणि वेदनाही कमी होतात.
Share