‘चंद्रमुखी’च्या यशानंतर अमृता खानविलकर तुळजाभवानीच्या चरणी

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर ही गेल्या काही दिवसांपासून ‘चंद्रमुखी’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला. या चित्रपटाच्या यशानंतर अमृता खानविलकरने अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ आणि तुळजापूरमधील तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले.

हा देवदर्शनाचा व्हिडीओ अमृता खानविलकरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओत ती देवदर्शन करताना दिसत आहे. या व्हिडीओला तिने भावूक कॅप्शनही दिले आहे. “लहानपणापासून वर्षातून एकदा अक्कलकोट आणि तुळजापूरला यायची सवय आहे. स्वामींनी आणि आईनं खूप दिलंय. चंद्रमुखी release झाला.. promotion च्या गडबडीत राहून गेलं होतं.. आज फक्त आभार मानायला आले. बास बाकी काहीच नाही”, असे कॅप्शन तिने दिले आहे.

https://www.instagram.com/reel/Cd37LSpsbNs/?utm_source=ig_web_copy_link

अमृता खानविलकरला मराठीतील सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. उत्तम अभिनय, कमालीचा डान्स आणि प्रत्येक भूमिकेला न्याय देणारी अभिनेत्री म्हणून तिची खास ओळख आहे. मराठी सिनेसृष्टीत अमृताचे नाव जितके चर्चेत असते तितकीच तिच्या नावाची चर्चा बॉलिवूडमध्येही असते. अमृताने आतापर्यंत अनेक मराठी, हिंदी चित्रपट, मालिका, वेबसीरिजमध्ये काम केले आहे. तिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. अमृता खानविलकर सोशल मीडियावर सक्रिय असते.

अमृता खानविलकरच्या ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले आहे. ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १.२१ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटातील गाणीही विशेष गाजली. मराठी चित्रपट सृष्टीतील भव्य दिव्य प्रमोशन झालेला सिनेमा अशी याची ओळख बनली. हा चित्रपट प्रदर्शित होऊन चार आठवडे होऊनही चित्रपटाची किमया कमी झालेली नाही. दिवसेंदिवस हा चित्रपट अधिकच गाजतो आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओकने केले आहे, तर पटकथा-संवादलेखन चिन्मय मांडलेकर याचे आहे. या चित्रपटात दमदार दौलतच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे तर अमृता खानविलकर चंद्राच्या म्हणजे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. आपल्या मोहमयी नजाकतीने अमृताने या चित्रपटातील लावण्यांद्वारे सर्वांचीच मने जिंकली आहेत. या चित्रपटाला अजय-अतुल यांच्या दमदार संगीताची साथ लाभली आहे.

टायटल रोल मिळालेला ‘चंद्रमुखी’ हा अमृताचा पहिला चित्रपट होता. त्यामुळे सुरुवातीपासूनच तिने या चित्रपटासाठी बरीच मेहनत घेतली. या यशाचे सार्थक झाल्यांनतर अमृता आता परमेश्वराच्या चरणी लिन झाली आहे. त्यासाठी तिने एक खास व्हिडीओ पोस्ट केला आहे.

 

Share