सरकारी रुग्णालयातच उपचार घ्या; विशेष न्यायालयाचा अनिल देशमुखांना झटका

मुंबई : १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना विशेष पीएमएलए न्यायालयाने झटका दिला आहे. अनिल देशमुख यांनी खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचाराची परवानगी मागितली होती. मात्र, पीएमएलए न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावली असून, खासगी रुग्णालयाऐवजी जे.जे. रुग्णालयात खांद्यावरील शस्त्रक्रिया करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

अनिल देशमुख यांनी न्यायालयात याचिका दाखल करत घरातील जेवण तसेच खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी परवानगी मागितली होती. या याचिकेवर सुनावणी करताना विशेष पीएमएलए न्यायालयाने देशमुख यांना कोणताही दिलासा दिला नाही. देशमुख यांनी खांद्याला झालेल्या दुखापतीवर शस्त्रक्रिया जे. जे. रुग्णालयात न करता खासगी रुग्णालयामध्ये करण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यांच्या या मागणीला ‘ईडी’ ने जोरदार विरोध केला होता.

अनिल देशमुख यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांच्या निखळलेल्या खांद्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही. जे. जे. रुग्णालयात अशी शस्त्रक्रिया करण्याची व्यवस्था आणि तज्ज्ञ डॉक्टरही उपलब्ध आहेत, असा अहवाल’ ईडी’ने न्यायालयात सादर केला होता. या अहवालाच्याआधारे ‘ईडी’ने देशमुख यांच्या खासगी रुग्णालयातील उपचारांच्या विनंतीला तीव्र विरोध दर्शविला होता. या अहवालाची दखल घेत विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी देशमुख यांची विनंती फेटाळली.

नवाब मलिकांना न्यायालयाचा दिलासा
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना विशेष पीएमएलए न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पीएमएलए न्यायालयाने त्यांना खासगी न्यायालयात उपचार घेण्यासाठी परवानगी दिली आहे. नवाब मलिक यांनी वैद्यकीय कारणासाठी जामिनाची मागणी केली होती. मात्र, पीएमएलए न्यायालयाने नवाब मलिक यांना जामीन दिला नसला तरी त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली आहे. नवाब मलिक यांच्यावर कुर्ला येथील क्रिटी केअर रुग्णालयात उपचार होणार आहेत. उपचारांबरोबरच पोलिस बंदोबस्तासाठी येणारा खर्च मलिक कुटुंबाला उचलावा लागणार आहे. मलिक यांच्यासोबत एकाच कुटुंब सदस्याला राहण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे.

https://twitter.com/ANI/status/1525007381671059456?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1525007381671059456%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fpudhari.news%2Fmaharashtra%2Fmumbai%2F183379%2FE0A4B8E0A4B0E0A495E0A4BEE0A4B0E0A580-E0A4A6E0A4B5E0A4BEE0A496E0A4BEE0A4A8E0A58DE0A4AFE0A4BEE0A4AEE0A4A7E0A58DE0A4AFE0A587E0A49A-E0A489E0A4AAE0A49AE0A4BEE0A4B0-E0A495E0A4B0E0A4BE-E0A485E0A4A8E0A4BFE0A4B2-E0A4A6E0A587E0A4B6E0A4AEE0A581E0A496E0A4BEE0A482E0A49AE0A580-E0A496E0A4BEE0A4B8E0A497E0A580-E0A489E0A4AAE0A49AE0A4BEE0A4B0E0A4BEE0A49AE0A580-E0A4AEE0A4BEE0A497E0A4A3E0A580-E0A4ABE0A587E0A49FE0A4BEE0A4B3E0A4B2E0A580%2Far

 

Share