केएल राहुल-अथिया शेट्टी लवकरच लग्नबंधनात अडकणार?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये लगीनघाई सुरू आहे. आता ही लग्नसराई क्रीडाविश्वातही पाहायला मिळणार आहे. रणबीर कपूर-आलिया भट्ट हे बॉलिवूडमधील क्युट जोडपे नुकतेच लग्नाच्या बेडीत अडकले. आता भारतीय क्रिकेटपटू के. एल. राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी हे दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा असून, ते कधी विवाहबद्ध होणार याची चाहत्यांनाही उत्सुकता लागली आहे.

भारतीय क्रिकेटपटू के. एल. राहुल वेगवेगळ्या कारणांसाठी नेहमीच चर्चेत असतो. सध्या तो आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार असून, आयपीएल क्रिकेटमध्येही तो धडाकेबाज खेळी करतोय. के. एल. राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्या रिलेशनशिपची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. अथिया शेट्टी ही अभिनेता सुनील शेट्टी यांची मुलगी आहे.

https://www.instagram.com/p/Cce2L6QBVrf/?utm_source=ig_web_copy_link

अथिया शेट्टी आणि के. एल. राहुल हे गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांनी अनेकदा आपल्या नात्याची कबुलीही दिली आहे. हे दोघे यापूर्वी अनेकवेळा एकत्र दिसले आहेत. सोशल मीडियावर या दोघांचे एकत्र फोटो अनेकदा व्हायरल झाले आहेत. नुकताच के. एल. राहुलचा वाढदिवस साजरा झाला. राहुलच्या वाढदिवशी अथियाने तिच्या सोशल मीडियावर दोघांचे खास फोटो शेअर करत एक प्रकारे दोघांमधील प्रेमाची कबुलीच दिली होती. तिच्या या फोटोंवर राहुलने ‘लव्ह यू ’, म्हणत तिच्यावरील प्रेम व्यक्त केले होते. लखनऊ सुपर जायंट्सचा सामना सुरू असताना के. एल. राहुलची फलंदाजी पाहण्यासाठी अथियाने अनेक वेळा हजेरी लावलेली आहे. आता हे दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. या दोघांच्या विवाहाची तयारीही सुरू झाली आहे. हे दोघे यावर्षी म्हणजेच २०२२ च्या हिवाळ्यापर्यंत विवाह करण्याची शक्यता आहे. सुनील शेट्टी हा मंगळुरचा असून, के. एल. राहुलचेही मंगळूरशी खास नाते आहे. त्यामुळे राहुल आणि अथियाचा लग्नसोहळा हा दाक्षिणात्य रितीरिवाजाप्रमाणे होणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र, अथिया शेट्टीचे वडील अभिनेता सुनील शेट्टी यांनी याबाबत मौन बाळगले आहे.

https://www.instagram.com/p/CV5yrGOA0Fh/?utm_source=ig_web_copy_link

Share