महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलली

मुंबई-  महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ‘ब’ मुख्यपरिक्षा २०२१ हि पुढे ढकलण्यात  आली आहे. या परीक्षेसाठी पूर्व नियोजित उमेदवारांपेक्षा जास्त उमेदवारांना प्रवेश द्यावा लागणार आहे. त्यामुळे आयोगाने छपाई केलेल्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकांच्या आधारे परीक्षा आयोजित करणे शक्य नाही. २९ जानेवारी, ५ फेब्रुवारी आणि १२ फेब्रुवारीला होणारी परीक्षा पुढील निर्णयापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

 

कोणत्याही परीक्षेकरता प्रवेश देण्यात आलेल्या उमेदवारांच्या संख्येच्या मर्यादेत आयोगाच्या कार्यालयाकडून उत्तरपत्रिका आणि प्रश्नपुस्तिकांची छपाई करण्यात येते. यामध्ये ऐनवेळी कोणत्याही कारणामुळे प्रवेश द्यायच्या उमेदवारांच्या संख्येत अल्प प्रमाणात होणारी संभाव्य वाढ विचारात घेतली जाते. या परीक्षेच्या अनुषंगाने राज्यातल्या विविध न्यायालयांनी दिलेल्या आदेशामुळे उमेदवारांच्या पूर्वनिश्चित संख्येपेक्षा खूप जास्त उमेदवारांना प्रवेश द्यावा लागणार आहे. त्यामुळे आयोगाकडून छपाई करण्यात आलेल्या प्रश्नपुस्तिका व उत्तरपत्रिकांच्या आधारे परीक्षा आयोजित करणं, परीक्षेच्या आयोजनासंदर्भातल्या इतरही बाबींची व्यवस्था करणं अल्पावधीत शक्य होणार नाही

Share