ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना राज्यापालांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबईः मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे काल निधन झाले आहे. वयाच्या  ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. हृदयविकाराच्या धक्क्यानं त्याचं निधन झाले होते.  ३० जानेवारीला रमेश देव यांचा वाढदिवस झाला होता. रमेश देव यांनी ब्लॅक अॅण्ड व्हाईट ते ओटीटी माध्यमांत काम केले आहे. त्यांच्या पत्नी सीमा देव यादेखील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत. रमेश देव यांनी साकारलेल्या अनेक भूमिका लोकप्रिय झाल्या आहेत.  त्यांच्या निधनानं एक पोकळी निर्माण झाली असल्याची भावना रमेश देव यांच्या चाहत्यांसह दिग्गजांनी व्यक्त केली आहे.

 

राज्यपालांनीही व्यक्त केलं दुःख

भगत सिंह कोश्यारी यांनी ट्विट करत दुःख  व्यक्त  केले  ” ज्येष्ठ चरित्र अभिनेते श्री रमेश देव यांच्या निधनाचे वृत्त समजून दुःख झाले. आपल्या सशक्त अभिनयाने त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या. भावपूर्ण श्रद्धांजली”

 

Share