कोरफडचे आरोग्यादायी फायदे

हिंदीमध्ये ग्वारपाठा, घृतकुमारी, इंग्लिशमध्ये अ‍ॅलोव्हेरा आणि मराठीत कोरफड म्हणून प्रसिद्ध असलेल्या या औषधी वनस्पतीला आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोरफडीचा गर त्वचेच्या सुंदरतेसाठी, सौंदर्यासाठी जितका कारक मानला जातो तितकाच तो आरोग्यासाठी देखील लाभदायक असतो. आपल्या सर्वांना नेहमी वाटतं की आपलं शरीर कायम निरोगी राहावं. तुम्हालाही ही इच्छा पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर नैसर्गिक आयुर्वेदिक औषधांमध्ये कोरफड एक अशी वनस्पती आहे जिचे सेवन रोज केल्याने कोणताही रोग आसपासही भटकत नाही आणि शरीर निरोगी राहते.

कोरफडाचे फायदे
कोरफडीच्या औषधी गुणांमुळे खरचटल्यास, कापल्यास, भाजल्यास किंवा एखादा किडा चावल्यास प्रथमोपचार म्हणून कोरफडचा वापर केला जातो.

जगभरात कोरफडीच्या तब्बल ४०० हून अधिक प्रजाती आढळतात. परंतु, त्यापैकी केवळ ५ प्रजाती वापरल्या जातात. कोरफडात असलेल्या गुणांमुळे केस दाट आणि सुंदर होण्यास मदत होते.

ही वनस्पती केसांच्या मुळातील पीएच घटकाचे संतुलन कायम राखण्यास मदत करते. कोरफडाने केस गळणे थांबते, केसांची वाढ चांगली होते, केसांतील कोंडा जातो, स्कॅल्पच्या समस्या दूर होतात आणि केसांचे चांगले पोषणही होते.

कोरफडचा वापर केल्याने पोटाच्या सर्व समस्या दूर होतात, असे म्हटले जाते. परंतु, कोरफडमध्ये आढळणारे लेटेक्स कोलायटिस क्रोहन रोग, अॅपेंडिसाइटिस, रक्तस्त्राव, पोटदुखी आणि अल्सर सारख्या समस्या निर्माण करू शकतात. म्हणून तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय त्याचा वापर करू नका.

कोरफडचे जास्त वेळा किंवा चुकीच्या पद्धतीने सेवन केल्यास शरीरातील पोटॅशियमची पातळी कमी होते. यामुळे हृदयाचा गतीमध्ये अनियमितता आणि अशक्तपणा या समस्या होऊ शकतात.

जर, आपण गॅसच्या समस्येस झगडत असाल, तर कोरफडचे सेवन करू नका. यामुळे अडचणी वाढू शकतात. १२ वर्षाखालील मुलांनी कोरफडचे सेवन करणे टाळले पाहिजे.

जर, आपण कुठलेही औषधे घेत असाल, तर कृपया कोरफड सेवन करण्यापूर्वी एकदा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कारण कोरफडमध्ये आढळणारे लॅक्टोस औषधांना शरीरात शोषून घेण्यापासून देखील प्रतिबंधित करतो.

कोरफड रस प्यायल्याने कधीकधी अॅलर्जी, त्वचेवर पुरळ, अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी, खाज सुटणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. भरपूर कोरफड रस प्यायल्याने आपल्या मूत्रपिंडाचे नुकसान देखील होऊ शकते.

कोरफड जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरात अॅड्रेनालाईनचा त्रास होऊ शकतो, जे हृदयाच्या समस्येने ग्रस्त लोकांसाठी हानिकारक आहे.

 

Share