महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्का लागल्याचं दाखवल तर मी राजकारण सोडेन – संदीप देशपांडे

मुंबई : मनसे नेते संदिप देशपांडे, संतोष धुरी यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. गेले अनेक दिवस हे दोघेही नेते भूमीगत होते. मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी यांना पोलिसांकडून ताब्यात घेतले जात होते, त्यावेळी दोन्ही नेत्यांनी वाहनानं पळ काढला. त्यावेळी त्यांच्या वाहनाच्या धक्क्यानं एक महिला पोलीस जखमी झाली, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. मात्र या प्रकणात जमीन मिळल्यानंतर दोघेही पहिल्यांदाच माध्यामसमोर आले आहेत. यावेळी त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, आम्ही सरकारविरोधात बोलू नये, आमचं तोंड बंद राहावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, आज तुमचे दिवस आहेत, उद्या आमचे येतील असा इशारा यावेळी संदीप देशपांडे यांनी दिला. सरकार सुडाचं राजकारण करत आहे, रात्री अपरात्री आमच्या कुटुंबियांना पोलिसांनी त्रास दिला, असा आरोप करत संदीप देशपांडे यांनी महाविकास आघाडीवरती टिका केली. आमच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आणि या गुन्ह्यासाठी पोलीस आम्हाल शोधत होते, केवळ दबाव निर्माण करण्यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल केला जात आहे, पण आमच्या कायद्यावर पूर्ण विश्वास होता आणि आम्हाला न्याय मिळाला असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं.

आमच्या वकिलांनी मीडियातील फूटेज कोर्टात दाखवलं त्यावरुन स्पष्ट झालं की आम्ही कोणताही गुन्हा केलेला नव्हता. महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्का लागल्याचं दाखवल तर मी राजकारण सोडेन, त्या महिला महिला पोलीस कर्मचाऱ्याला सक्तीच्या रजेवर का पाठवलं आहे, असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. केंद्र सरकार सूडाचं राजकारण करतंय असं उद्धव ठाकरे म्हणतात, मग तुन्ही काय करताय, असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला.

Share