भारत व ब्रिटन यांच्यातील संबंध पूर्वीपेक्षा अधिक चांगले : बोरिस जॉन्सन

नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. गुजरातमध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या स्वागताने ते चांगलेच भारावून गेले होते. “माझे उत्तम स्वागत केले, त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप खूप आभार. यापूर्वी भारत आणि ब्रिटन यांच्यामध्ये जसे संबंध होते, त्यापेक्षा अधिक चांगले संबंध आता प्रस्थापित झाले आहेत,” अशी प्रतिक्रिया जॉन्सन यांनी या स्वागतानंतर दिली.

अहमदाबादमध्ये बोरिस जॉन्सन यांच्या स्वागताचे बॅनर्स सर्वत्र लावण्यात आले होते. ते पाहून मी भारावून गेलो. मी सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन असल्यासारखे मला वाटत होते, असे जॉन्सन म्हणाले. बोरिस जॉन्सन यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. नरेंद्र मोंदी हे मित्र असल्याचे सांगत भारत व ब्रिटन या दोन्ही देशांचे संबंध मजबूत झाल्याचे जॉन्सन म्हणाले. भारत आणि ब्रिटन कठीण काळात एकत्र आल्याचे सांगून दोन्ही देशांनी सुरक्षेच्या संदर्भातील भागीदारी वाढवण्यासाठी चर्चा केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दोन्ही देशांमध्ये सुरक्षा विषयक करार झाले असून, लढाऊ विमाने आणि सागरी क्षेत्रासंदर्भातील तंत्रज्ञान भारताला देण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना विषाणू संसर्गापासून वाचण्यासाठी भारतात तयार झालेली लस घेतली आपण घेतली असल्याचे सांगून भारताचे यासाठी आभार मानतो, असे जॉन्सन म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोरिस जॉन्सन यांच्याशी रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धासंदर्भात चर्चा केल्याची माहिती आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवणे आणि त्या प्रश्नावर राजनैतिक मार्गाने प्रयत्न करायला हवेत, या मुद्द्यावर नरेंद्र मोदींनी भर दिला. बोरिस जॉन्सन यांनी आज सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. तसेच उद्योगपतींशीदेखील चर्चा केली.

Share