‘शाळेत ना जय माता दीचा दुपट्टा चालणार ना बुरखा’- कंगना रणौत

मुंबईः  कर्नाटकमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून हिजाबचा वाद सुरू झाला आहे. उडपी येथे हिजाब घातलेल्या विद्यार्थिंनींना महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. त्यानंतर त्यांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली. मात्र, विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाच पालन करावे लागेल, असे सरकारने सांगितले. त्यानंतर विद्यार्थिनींनी न्यायालयात धाव घेतली. पण, विद्यार्थिनी हिजाब घालून आल्या, तर आम्ही भगवे शेले घेऊन येऊ अशी भूमिका हिंदूत्ववादी विद्यार्थ्यांनी घेतली होती. त्यानंतर हा वाद अधिक तीव्र झाला. आता यावर बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतने तिचे मत मांडले आहे. ज्यामुळे ती चर्चेचा विषय ठरली आहे. कंगना म्हणाली की शाळेने कोणत्याही धार्मिक चिन्हाला प्रमोट केले नाही पाहिजे.

कंगना सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट शेअर करत इराणमधील ‘बुर्का टू बिकिनी’ असा फोटो शेअर करत म्हणाली होती की, ‘तुमच्यात हिम्मत असेल तर अफगाणिस्तानमध्ये बुरखा घालून दाखवा.’ तर कंगनाच्या या पोस्टवर शबाना आझमी यांनी पलटवार करत तिला प्रश्न केला होता की, ‘अफगाणिस्तान आणि भारतामध्ये फरक आहे हे कंगनाला माहीत नाही का?’

यावर आता कंगनाने तिची प्रतिक्रिया दिली आहे. ‘मुलांच्या शिक्षणासाठी हिजाबपेक्षा पुस्तक महत्त्वाची आहेत. शाळेत जय माता दीचा दुपट्टा किंवा बुरखा यापैकी काहीही घालू शकत नाही. आपल्या गणवेशाचा आदर करणे महत्त्वाचे आहे. शाळांमध्ये कोणत्याही धार्मिक चिन्हाचा किंवा वस्तूचा प्रचार करू नये’, असे कंगना म्हणाली.

Share