महाराष्ट्राची लाडकी जोडी देणार ‘गूड न्यूज’

मुंबईः  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखआणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा यांच्या जोडीला प्रेक्षकांची नेहमीच पसंती मिळते. रितेश आणि जेनेलिया यांनी नुकतीच त्यांच्या चाहत्यांना एक गूड न्यूज दिली. त्यांनी ‘मिस्टर मम्मीया आगामी चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये रितेश चक्क प्रेग्नंट दिसत आहे. त्यांच्या आगामी ‘मिस्टर मम्मी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

https://www.instagram.com/p/CZisgwToflO/?utm_source=ig_web_copy_link

मिस्टर मम्मी या चित्रपटाचं पोस्टर शेअर करून जेनेलियानं कॅप्शनमध्ये लिहिले, ‘पोट दुखेपर्यंत हसण्यासाठी तयार व्हा. कधीही न पाहिलेली कथा लवकरच तुमच्या भेटीस येत आहे.’

 

‘मिस्टर मम्मी’ या रितेश आणि जेनेलियाच्या आगामी चित्रपटाची निर्मीती भूषण कुमार, कृष्ण कुमार, शाद अली आणि शिव अनंत यांनी केली आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन शाद अली यांनी केले आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये रितेश आणि जेनेलिया हे दोघेही प्रेग्नंट दिसत आहेत.

Share