एकदा काय ते होऊनच जाऊ दे…मनसेकडून पुण्यातील सभेचं टीझर रिलीज

मुंबई : मुंबई, ठाणे, ओरंगाबाद नंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात जाहीर सभा होणार आहे. पुण्यातील गणेश क्रीडा मंच येथे २२ मे रोजी सकाळी १० वाजता सभा होणार असल्याची माहिती मनसेने दिली आहे. राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित झाल्यानंतर आणि पुण्यातली सभा रद्द झाल्यानंतर रविवारच्या मेळाव्याकडे मनसैनिक आशेनं बघतायत. या मेळाव्यासाठी जय्यत तयारी मनसैनिकांकडून करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेचा टिझर मनसेकडून प्रदर्शित करण्यात आला आहे.

टिझरमध्ये राज ठाकरेंच्या सुरुवातीला औरंगाबादच्या सभेतील एकदा काय ते होऊनच जाऊ दे… हे वाक्य घेण्यात आले आहे. तर टिझरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गाणही वाजत आहे. या टीझरवरून पुण्यातील सभा जोरदार होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्या अनुषंगाने मनसेचे पुण्यातील सर्व पदाधिकारी जोमाने कामाला लागले आहेत.

 

 राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध 

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा झाल्यापासूनच त्यांच्या दौऱ्याला अयोध्येतील साधू संत, तसेच भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचा विरोध आहे. “आधी राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि त्यानंतर त्यांनी अयोध्येत यावं”, असं भाजप खासदार म्हणतात. तर मुस्लिम पक्ष आणि बाबरी मशिद प्रकरणी पक्षकार असलेले इक्बाल अन्सारी यांनी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यालाही विरोध केला होता.

 

Share