सुप्रिया सुळेंबाबत अब्दुल सत्तारांचं वादग्रस्त वक्तव्य

जालना : नेहमी आपल्या वादग्रस्त वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत असणारे  राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काॅँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

अब्दुल सत्तार सुप्रिया सुळेंबद्दल काय म्हणाले?
‘सुप्रिया सुळे म्हणताहेत की, ५० खोके तुम्हालाही मिळालेत का? त्यावर तुम्ही (अब्दुल सत्तार) त्यांना म्हणता का तुम्हाला द्यायचेत का? तर त्यावर त्या (सुप्रिया सुळे) म्हणताहेत की, तुमच्याकडे आले असतील म्हणूनच तुम्ही त्यांना ऑफर करताहेत… काय सांगाल?’, असा प्रश्न ‘लोकशाही’ वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने अब्दुल सत्तार यांना विचारला. त्यावर अब्दुल सत्तार म्हणाले, ‘इतकी भिकार#$ झाली असेल, सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ’, असं उत्तर सत्तारांनी दिलं.

सत्तारांवर टीकेची झोड
महाराष्ट्रातील अनुभवी मंत्र्यानं घाणेरड्या पातळीवर जाऊन बोलणं चुकीचं आहे. अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा काँग्रेस तर्फे निषेध करते. सत्तार यांनी या प्रकरणी माफी मागावी, असं काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.

Share