‘बायको पाहिजेच्या’ बॅनरने औरंगाबाद शहरात चांगलीच चर्चा

औरंगाबाद-  निवडणूकीचा हंगाम सध्या सुरु आहे. यातच औरंगाबाद शहरातील अवलीयाने  बायको पाहिजे असे बॅनर लावले आणि या बॅनरच्या चर्चा आता चांगल्याच रंगल्या आहेत. हे बॅनर शहरात तीन ठिकाणी लावण्यात आले आहे. तसेच जातीची कुठलीही अट नाही, असंही या बॅनरवर लिहिलं आहे.

रमेश विनायकराव पाटील असे या बॅनर लावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मला तीन मुले असल्याने मी निवडणूक लढवण्यासाठी कायद्याच्या चौकटीत बसत नाही. त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे. त्यासाठी कुठलीही जातीची अट नाही. कुठल्याही जातीची महिला चालेल. वय वर्ष २५ ते ४० वयोगटातील अविवाहीत, विधवा किंवा घटस्फोटीत महिला चालेल. पण, त्यात एक अट ठेवण्यात आली आहे. या महिलांना दोनच अपत्य असावी. जास्त असेल तर त्या महिलांना स्वीकारण्यात येणार नाही, असं या बॅनरवर लिहिलं आहे.

 

Share