नवाजुद्दीन सिद्दीकीच्या नवीन बंगल्यावर होतोय सध्या शुभेच्छांचा वर्षाव

मुंबईः अतिशय कमी वेळात प्रेक्षकांना आकर्षित करणारा अभिनेता म्हणुन नवाजुद्दीन सिद्दीकीला ओळखले जाेते.तो त्याच्या कामामुळे नेहमीच दर्शकांच्या चर्चेत असतोच. काही दिवसांआधी मुंबईला घर घेतल्याची माहिती सिद्दीने सोशल मीडियाद्वारे शेअर केली. त्याने या नविन घराचे नाव वडीलांच्या नावावरुन ‘नवाब’ असे ठेवले आहे. नवाजुद्दीने घराचा फोटो शेअर केला. तर त्याच्या अनेकचाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

नेहमीच वादग्रस्त म्हणुन ओळखली जाणारी बॉलिवूडची क्विन अभिनेत्री कंगना रणौत हिनेही नवाजुद्दीनला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.ती सोशल मिडीयावर नेहमी सक्रिय असते आणि त्यात ती नवनविन वाद निर्माण करत असते. त्यातलीच एक शुभेच्छा देणारी पोस्ट तिनी नवाजुद्दीन सिद्दीकीला केली आहे.सर्वात विषेशबाब म्हणजे कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर नवाजच्या नवीन घराचा फोटो पोस्ट केला आहे. कॅप्शन देत तिने अभिनंदन केले आहे. फोटो शेअर करत कंगना म्हणाली की, नवाजुद्दीन सिद्दीकी सरांनी स्वत:चे नवीन घर स्वत: डिझाईन केले आहे. ते फार सुंदर आहे. खूप खूप अभिनंदन. दरम्यान कंगनाची ही पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

यादरम्यान कंगना म्हणाली नवाजुद्दीन सिद्दीकीने त्याच्या नव्या घराचे इंटीरियर स्वतः डिझाइन केले आहे. त्याचे हे घर मुज्फ्फरनगर येथील बुढानामधील घरासारखे असणार आहे. त्याने नव्या घराचे नाव वडीलांच्या नावावरुन ‘नवाब’ असे ठेवले आहे. नवाजुद्दीनच्या वडीलांचे नाव ‘नवाबुद्दीन सिद्दीकी’ असे आहे. नवाजने या नव्या आलिशान बंगल्याला चारही बाजूने पांढरा रंग दिला आहे.

नवाजुद्दीना नवीन आलिशान बंगला बांधण्यासाठी तीन वर्षे लागली आहेत. मुंबईतील त्याचं हे नवं घर एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नसणार.नवाजच्या या बंगल्याची तुलना थेट शाहरूख खानच्या मन्नतशी होतीये. सध्या नवाजुद्दीन कामात व्यग्र आहे. तो लवकरच कंगनाच्या ‘टीकू वेड्स शेरु’ या चित्रपटात काम करत आहे. साई कबीर दिग्दर्शित या चित्रपटामध्ये त्याच्या सोबतच अवनीत कौर दिसणार आहे

Share