शिवसेना खा. राजेंद्र गावित यांना १ वर्ष तुरुंगवास, पावणे दोन कोटी दंड

पालघर-   महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर गुन्हा दाखल होत आहे.  न्यायालय शिक्षा देत आहेत. आता शिवसेनेचे खा. राजेंद्र गावित यांना पालघर जिल्हा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाने एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. गावित यांना एक वर्षाचा तुरुंगवास आणि १ कोटी ७५ लाख रुपये दंड आकारला आहे. जागेच्या व्यवहारातून राजेंद्र गावित यांनी व्यावसायिक चिराग किर्ती बाफना यांना दीड कोटीचे चेक दिले होते. मात्र, हे चेक बाऊन्स झाल्याने राजेंद्र गावितांच्या विरोधात पालघर न्यायालयात खासगी दावा दाखल केला होता. त्यानंतर आता गावित यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

पालघरचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विक्रांत खंडागळे ज्यांनी खासदारांची बाजू ग्राह्य न धरता त्यांना पावणेदोन कोटी रुपयांची भरपाई तसेच एक वर्षाची शिक्षा देण्याचे आदेश दिले आहेत . या निकालानंतर खासदारांनी न्यायालयात केलेला जामीन अर्ज मंजूर करण्यात आला असून, भरपाईची रक्कम भरण्यास किंवा निकालाविरुद्ध स्थगिती आदेश घेण्यास महिन्याचा कालावधी दिला आहे.

Share