मुलायम सिंह यादव व्हेंटिलेटर सपोर्टवर; पंतप्रधानांचा अखिलेश यादवांना फोन

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलायम सिंह यांना खोलीतून आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे. मुलायम सिंह यांच्या प्रकृतीवर डॉक्टर सतत लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि मुलायम सिंह यांचे पुत्र अखिलेश यादव यांच्याशी फोनवरून चर्चा करत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. मुलायमसिंह यादव हे सध्या ८२ वर्षांचे असून गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती सतत खालावत आहे.

 

याशिवाय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही मुलायमसिंह यादव यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली आहे.“उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळताच मी त्यांचे चिरंजीव अखिलेश यादव यांना फोन करून विचारपूस केली. ईश्वराकडे एवढीच प्रार्थना आहे की ते लवकरात लवकरक बरे व्हावेत.” असं राजनाथ सिंह यांनी ट्वीट द्वार सांगितले आहे.

 

याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथा यांनीही अखिलेश यादव यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून मुलायमसिंह यादव यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केल्याचेही समोर आले आहे. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मुलायमसिंह यादव यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे.

Share