राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अखेर त्यांना आठ दिवसांच्या उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ब्रीज कॅंडी हॉस्पिटलमध्ये ३१ ऑक्टोबर रोजी दाखल झाले होते. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी  दाखल करण्यात आलं होतं. परंतु मागील तीन दिवसपासून पवारांना डिस्चार्ज दिला जाणार होता अस बोलं जात होतं. परंतु, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने रुग्णालयातील मुक्काम वाढला होते. त्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

दरम्यान, रुग्णालयात उपचार सुरु असताना देखील शरद पवार यांनी शिर्डी येथील राष्ट्रवादीच्या शिबिराला हजेरी लावली होती. शरद पवार डॉक्टरांच्या पथकासह विशेष हेलिकॉप्टरने शिर्डी येथे पक्षाच्या शिबिरासाठी दाखल झाले होते. शिबिराच्या स्थळी दाखल झाल्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घोषणांत पवार यांचे स्वागत केलं. यावेळी शरद पवार यांनी पाच मिनिट कार्यकर्त्यांशी संवाद साधला होते. त्यानंतर माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पवार यांचं भाषण वाचून दाखवलं होतं.

Share