नेहा-यशचा साखरपुडा लवकरच पार पडणार

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेतील नेहा कामत म्हणजेच अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि यश चौधरी म्हणजे अभिनेता श्रेयस तळपदे या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. नेहा आणि यश यांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक आहेत. आता लवकरच मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अनेक अडचणींना सामोरे जात नेहा आणि यश या दोघांचा साखरपुडा लवकरच पार पडणार आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत सतत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत असतात. त्यामुळे प्रेक्षक नेहमीच मालिका पाहण्यासाठी उत्सुक असतात. या मालिकेतील मायरा वैकुळ म्हणजेच परी या चिमुकलीने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. मायरासोबत या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, संकर्षण कऱ्हाडे, प्रदीप वेलणकर या कलाकारांमुळे मालिकेला चार चांद लागले आहेत. या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे हा यशची भूमिका साकारत आहे, तर अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही नेहाची भूमिका साकारत आहे. या मालिकेतील यश आणि नेहाची केमिस्ट्री सर्वांना फार आवडताना दिसत आहे. सध्या या मालिकेत यश आणि नेहा हे आजोबांना परीबद्दल सर्व सत्य सांगण्यासाठी धडपड करत असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे सिम्मी ही काही ना काही कारस्थान करताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CeBuoPNMAxb/?utm_source=ig_web_copy_link

या मालिकेत सध्या यश-नेहाच्या प्रेमाचा ट्रॅक सुरू आहे. मालिकेत नेहा आणि यशला आपल्या प्रेमासाठी सतत संघर्ष करावा लागत आहे. एकीकडे एक मुलगी असणारी सर्वसामान्य घरातील नेहा आणि दुसरीकडे एक उद्योगपती, आई-वडील गमावलेला, आजोबांनी, काका-काकींनी सांभाळ केलेला यश. या दोघांना आपले कुटुंब आणि त्यांच्या विविध जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत आहेत. त्यामुळे त्यांना नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे; परंतु मालिकेत लवकरच नवा ट्रॅक पाहायला मिळणार आहे.

https://www.instagram.com/p/CeBuv_ZsIvN/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, आता ही मालिका रंजक वळणावर आली आहे. नुकतेच या मालिकेत यश हा आजोबांना परीबद्दलचे सत्य सांगणार आहे. यानंतर आता या मालिकेत एक सुखद वळण पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेतून नेहा म्हणजेच अभिनेत्री प्रार्थना बेहरेने ‘ब्रेक’ घेतला होता. प्रार्थना ही तिच्या खऱ्या आयुष्यातील पतीसोबत लंडनला गेली होती. त्यामुळे तिने या मालिकेतून ‘ब्रेक’ घेतला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच नेहा म्हणजेच अभिनेत्री प्रार्थना बेहरे या मालिकेत परतली आहे. त्यानंतर आता या मालिकेत एक सुखद ट्रॅक पाहायला मिळणार आहे.

https://www.instagram.com/reel/CeBxxH6jQeE/?utm_source=ig_web_copy_link

या मालिकेच्या पुढील भागात यश आणि नेहाचा साखरपुडा पाहायला मिळणार आहे. सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा नवा प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये नेहाने सुंदर हिरवीगार साडी परिधान केली आहे. केसांत गजरा माळला आहे. शिवाय सुंदर अशी ऑक्सइड ज्वेलरी घातली आहे. नेहाचा हा लूक सध्या चांगलाच व्हायरल होत आहे, तर यशने नेहाच्या लुका मॅच होईल अशी ड्रेफरी केली आहे. या पारंपरिक लूकमध्ये दोघे खूप सुंदर दिसत आहेत. तसेच प्रार्थना बेहरेने आपल्या इंस्टा अकाऊंटवर या लूकमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना नेहा लवकरच एंगेज होणार, अशी माहिती दिली आहे. यश आणि नेहाचा साखरपुडा कसा होणार आणि मालिकेत आणखी काय घडणार याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

https://www.instagram.com/reel/CeDRRh4pcxm/?utm_source=ig_web_copy_link

 

Share