पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, वाचा काय आहे आजचा भाव?

नवी दिल्ली : देशात सलग सहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये दरवाढ कायम आहे. नव्या दरांनुसार पेट्रोलच्या दरात प्रति लिटर मागे ५० पैशांची तर डिझेलच्या दरात ५५ पैशांची वाढ करण्यात आली आहे. सहा दिवसांतील पेट्रोल-डिझेलच्या दरातील ही पाचवी वाढ आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासून देशभरात हे नवे दर लागू झाले आहेत.

आज पेट्रोलच्या दरात प्रति लिटर मागे ५० पैशांची तर डिझेलच्या दरात ५५ पैशांची वाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर ११३.८८ तर डिझेल ९७.५५ रुपयांवर पोहोचले आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोल ११३.३७ आणि डिझेल९८.३५  रुपये प्रति लिटर आहे. तर उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोल ११३.०६ रुपये लिटर आणि डिझेल ९५.८५ रुपये लिटर इतके आहे.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकरे तपासा

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

आजचे पेट्रोल-डिझेलचे दर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून देखील जाणून घेऊ शकताय. SMS च्या माध्यमातून देखील तुम्हाला नेहमीचे दर कळू शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून ९२२४९९२२४९ या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे.

Share