राज्यातील कोणत्याही शाळेची वीज कापली जाणार नाही- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

औरंगाबाद : राज्यातील ६८९ शाळांचे वीजबिल थकल्यामुळे त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यानंतर हे वीजबिल भरल्याचे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात महावितरणकडे बिल भरणा झालेला नाही. तरीही यासाठीची रक्कम देण्यात आली असून त्वरीत वीज जोडणी द्यावी, असे सांगण्यात आले आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

तसेच वीज बिल थकबाकीमुळे राज्यातील जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्था, मनपा आणि इतर कोणत्याही शाळांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही, अशी माहितीदेखील वर्षा गायकवाड यांनी दिली. औरंगाबादमधील सातारा गावातील जिल्हा परिषद शाळेत शाळा पूर्वतयारी अभियानातील पहिले पाऊल या राज्यस्तरीय मेळाव्यात त्या बोलत होत्या.

Share