आता संविधानाचा अभ्यास सर्व विद्याशाखांसाठी अनिवार्य

‘भारतीय संविधानाची ओळख’ हा विषय सर्व विद्यापीठांतील सर्व विद्याशाखांसाठी विषय अनिवार्य करण्यात आलाय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्त काल झालेल्या सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. आपल्या हक्कांची, संवैधानिक अधिकारांची आणि कर्तव्यांची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी भारताचे संविधान सर्वसामान्य जनतेला सहज उपलब्ध होणे गरजेचे आहे.

भारतीय संविधान हे पाठ्यपुस्तकांपूरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना संविधानाची पूर्ण संपूर्ण ओळख शालेय अभ्यासक्रमातून व्हावी भारतीय संविधानामध्ये नेमके काय सांगितले आहे, त्यातील तत्त्वे कोणती, त्यांचे पालन करणे कसे गरजेचे आहे.  हे विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थ्यांना कळायला हवे.

याच जाणीवेतून हा निर्णय घेण्यात आला त्याचबरोबर संविधांची प्रत वितरित करण्याचा कार्यक्रम शालेय शिक्षण विभागातर्फे राज्यभर राबवण्यात येत आहे. बाबासाहेबानी घटना परिषदेच्या माध्यमातून अथक परिश्रम घेऊन लिहिलेली भारतीय राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला करण्यात आली होती.

Share