औरंगाबाद मनसे कार्यकर्त्यांवर पोलिसांच्या कारवाईचा बडगा

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादेत सभा पार पडली. यानंतर आता पोलिसांनी औरंगाबादचे मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्या घरी जाऊन पोलिसांनी नोटीस दिली आहे. तसेच मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, आदींना पोलिसांनी नोटीस धाडल्या आहे.

उद्यापासून मशिदीवरील भोंगे काढले नाहीत तर मशिदींसमोर हनुमान चालिसा दुप्पट आवाजात वाजवण्याचे आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिले आहेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस अलर्ट झाले आहेत. तसेच राज्यातील अनेक मनसे नेत्यांना पोलिसांना नोटीसा बजावल्या आहेत.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज सकाळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषद घेत कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न हाताळण्यास पोलिस सक्षम आहे. समाजकंटक आणि गुन्हेगार स्वरूपाच्या लोकांवर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच, राज्यात सामाजिक एकोपा ठेवण्यासाठी अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत. जनतेने शांतता, सुव्यवस्था राखून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.

Share