पटोलेंचं वक्तव्य हास्यास्पद, केवळ हेडलाईन मिळवण्यापुरतं : अजित पवार

मुंबई : मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष काॅँग्रेसच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करीत आहे. आमच्या विरोधात त्यांच्या कुरघोड्या सातत्याने सुरु आहेत. याचा जाब आम्ही त्यांना नक्कीच विचारु असं नाना पटोले यांनी म्हटंल होतं. नाना पटोले यांनी केलेल्या विधानाचा अजित पवारांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

नाना पटोलेंच्या टीकेवर अजित पवारांना आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये तोंडसुख घेतलं आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी एक वक्तव्य केलं की पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं. वास्तविक नानांचं ते वक्तव्य हास्यास्पद वाटतं. कारण नानाच मागे कुठल्या पक्षातून काँग्रेसमध्ये आले ते तुम्हाला माहिती आहे. ते भाजपामध्ये होते. मग आता भाजपानं म्हणायचं का असा टोला पवारांनी लगावलाय.

हेडलाइन करण्यासाठी खंजीर खुपसला वगैरे बोलायला चांगलं वाटत असेल. पण आघाडीत तिन्ही पक्ष एकत्र काम करत आहेत. राज्य स्तरावरील निर्णय राज्यातले नेते घेत असतात. जिल्ह्याच्या पातळीवर वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. तिथल्या गोष्टी नीट राहण्यासाठी नेत्यांमध्ये समन्वय असणं गरजेचं आहे. आता काँग्रेसनंही अनेक ठिकाणी भाजपासोबत संधान बांधलं, मी त्याला फार महत्व देऊ इच्छित नाही. जबाबदार नेत्यांनी जबाबदारीनं बोलावं”, असा सल्ला यावेळी अजित पवार यांनी नाना पटोले यांना दिला.

Share