प्रतापसिंह राणे यांना गोवा कॅबिनेटचा विशेष दर्जा

गोवा-  प्रतापसिंह राणे यांनी नुकतेच आमदारकीचे ५० वर्ष पूर्ण केले आहेत. त्यांच्या या सन्मानार्थ गोवा विधानपरिषदेत एक ठराव मंजूर करण्यात आला. तो ठराव विशेष म्हणजे भाजप आमदारांनी देखील मंंजूर केला.गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे ८७ वर्षीय यांच्या या प्रदीर्घ अनुभवाची आणि कामगरीची परतफेड म्हणून गोवा कॅबिनेटनं त्यांना आजीवन कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात गोव्याच्या कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून त्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्विटरवर दिली आहे.

https://twitter.com/DrPramodPSawant/status/1479033333833031680?s=20

तसेच गोव्यात विधानपरिषदेत अध्यक्षपद आणि ५० वर्षे आमदारकीचा तसेच माजी मुख्यमंत्री राहिलेल्या प्रदीर्घ अनूभव असनाऱ्यांना गोवा राज्यात आजीवन कॅबिनेटचा दर्जा देण्यात येणारा ठराव विधान सभेत मंजूर करण्यात आला .

 

Share