राहुल लोणीकरांची भाजयुमोच्या प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई : भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदी राहूल लोणीकर यांची निवड करण्यात आली आहे. आज भाजप युवा मोर्चाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात बैठकीत आयोजितराज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून महत्त्वाची पावले उचण्यास सुरुवात झाली आहे. भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युवकांना मोठ्या प्रमाणात संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्च्याच्या प्रदेशाध्यक्षची आज निवड करण्यात आली. करणार आली होती. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, युवा मोर्चा माजी प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत राहुल लोणीकर यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून महत्त्वाची पावले उचण्यास सुरुवात झाली आहे. भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युवकांना मोठ्या प्रमाणात संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्च्याच्या प्रदेशाध्यक्षची आज निवड करण्यात आली.

Share