‘राज’गर्जना काही तासांवर; औरंगाबादचं ऐतिहासिक मैदान सज्ज, काय आहे तय्यारी?

औरंगाबाद : शहरातील खडकेश्वर येथील ऐतिहासिक मराठवाडा सांस्कृतिक मैदान ‘राज’गर्जनेसाठी सज्ज झाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा अवघ्या काही तासातच या ठिकाणी पार पडणार आहे. या सभेसाठी औरंगाबाद बरोबरच इतर जिल्ह्यातूनही मनसैनिक मोठ्या संख्येने शहरात दाखल झाले आहेत. तसेच सभेसाठीची सगळी तयारी पूर्ण झाली आहे.

काय आहे तयारी? 

  • राज ठाकरे यांच्या भाषणासाठी 20 बाय 60 चे व्यासपीठ उभारण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग याची पाहणी करेल तर व्यवस्थापनाची जबाबदारी मुंबईच्या कंपनीची असेल.
  • औरंगाबादचं तापमान मागील तीन दिवसांपासून 42 अंशांपर्यंत पोहोचलं असून संध्याकाळपर्यंत उष्णतेची धग कायम आहे. दुपारपासूनच प्रेक्षकांची गर्दी होणार असल्याने आयोजकांनी 05 हजार लीटरच्या दोन पाण्याचे टँकर मागवले आहेत. याद्वारे सभेचं मैदान थंड केलं जाईल
  • राज ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी दीड हजार पाण्याचे जार मागवले जातील.
  • सभेसाठी सहा टेम्पोभरून साहित्य, मजूर, शुक्रवारी सकाळीच शहरात दाखल झाले आहे
  • सभेच्या नियोजनाचे कंत्राट मुंबईच्या दोन कंपन्यांना दिले आहे. स्थानिक कंपनीला खुर्च्या, बांबू इतर किरकोळ कामे देण्यात आली आहेत
  • मैदानावर दोन्ही बाजूने फ्लाइंग स्पीकर लावले आहेत.
  • 32 सेटमधील स्पीकर मैदान व गर्दीचा अंतिम अंदाज घेऊन लावले जातील एका सेटमध्ये 08 बॉक्स असे 24 सेट लागतील, असा अंदाज आहे.
  • राज ठाकरे यांच्या सभेला येणाऱ्या प्रेक्षकांची वाहने पार्क करण्यासाठी ठराविक मैदाने दिली आहेत. कर्णपुरा मैदान, एमपी लॉ कॉलेज, एसबी मैदानावर ही पार्किंग असेल तसेच खडेश्वरला पोलीस अधिकारी महत्त्वाचे नेते व अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांसाठी पार्किंग असेल
Share