राजीव कुमार देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त; १५ मे रोजी पदभार स्वीकारणार

नवी दिल्ली : राजीव कुमार यांची देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते १५ मेपासून या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

https://twitter.com/ANI/status/1524659162827091968?s=20&t=Fo8UdpRI1lV24jTXYel5wQ

सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांचा कार्यकाळ १४ मे रोजी संपत आहे. त्यानंतर १५ मे रोजी राजीव कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्यभार हाती घेतील. त्यांच्या नियुक्तीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी राजीव कुमार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

https://twitter.com/KirenRijiju/status/1524653301924757504?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1524653301924757504%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fpudhari.news%2Fnational%2F182718%2Frajiv-kumar-has-been-appointed-as-the-chief-election-commissioner%2Far

राजीव कुमार यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९६० रोजी झाला. त्यांनी बी.एससी., एलएलबी., पीजीडीएम आणि एम. ए. पब्लिक पॉलिसी असे शिक्षण घेतले आहे. बिहार/झारखंड केडर १९८४ बॅचच्या भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी असलेले राजीव कुमार फेब्रुवारी २०२० मध्ये प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत. केंद्रातील अनेक मंत्रालयात तसेच आपल्या बिहार-झारखंड केडरमध्ये त्यांनी ३६ वर्षांची सेवा बजावली आहे. राजीव कुमार यांनी सामाजिक, वन आणि पर्यावरण, मानव संसाधन, वित्त आणि बँकिंग क्षेत्रातही काम केलेले आहे.

Share