औरंगाबाद शहरात सर्वपक्षीय नेत्यांकडून राम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

औरंगाबाद : कोरोना आणि त्यामुळे असलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या दोन वर्षांपासून श्रीराम जन्मोत्सव सोहळा अगदी शांततेत पार पडत होता. यावर्षी मात्र कुठला कोरोना नाही आणि कुठलेही निर्बंध नाही त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत शहरात श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा केला.

शहरातील कॅनॉट प्लेस परिसरात युवकांनी स्टेज टाकून त्याठिकाणी आकर्षक अशी श्रीरामांची मुर्ती आणण्यात आली होती.  तसेच श्रीरामांचे गाणे लावून त्यावर थिरकताना  ही तरूणाई दिसली. त्याचप्रमाणे शहरातील जुने आणि महत्त्वाचे किराडपुरा येथील श्रीराम मंदिरात अनेक वर्षांच्या प्रथेनुसार सर्व पक्षीय नेते आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत भव्य महाआरती पार पडली. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, भाजप आमदार अतुल सावे, शिवसेना आमदार अंबादास दानवे, मनसे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर, भाजप जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांच्यासह मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती. तसेच कुठलीही अनुचीत घटना घडू नये यासाठी पोलीसांचाही चोख बंदोबस्त बघायला मिळाला.

Share