आज रणबीर-आलियाचे लग्न ; सुरतहून आली खास भेट

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट आज लग्नबंधनात अडकणार आहेत.काल त्यांची मेहंदी सेरेमनी होती. याप्रसंगी एक आगळी वेगळी भेट रणबीर आणि आलियाला मिळाली आहे. सुरत येथील एका ज्वेलरने या जोडप्याला अस्सल सोन्याचा मुलामा असलेला पुष्पगुच्छ पाठवला आहे. पुष्पगुच्छ हातात घेतलेल्या दोन व्यक्तींचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या  व्हीडिओमध्ये एका व्यक्तीने हातात तो पुष्पगुच्छ धरलेला दिसून येत आहे.

आम्ही सुरतहून आलो असून ही रणबीर आणि आलियासाठी भेट आहे. हा सोन्याचा मुलामा असलेला गुलाबाचा पुष्पगुच्छ असून 100% खरा आहे. व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीने आपले नाव रौनक असे सांगितले आहे. तर ही भेट पाठवणाऱ्याचे नाव ‘कुशाल भाई ज्वेलर्स’ असे असल्याचे त्याने सांगितले.

रणबीर आणि आलिया बॉलिवूड मधील सर्वात क्यूट कपल पैकी एक असल्याने सगळ्यांच लक्ष त्यांच्या लग्न सोहळ्याकडे लागल आहे.आज १४ एप्रिलला ते दोघ विवाह बंधनात अडकणार आहेत त्यामुळे कपूर निवासात आज सकाळी 11 वाजल्यापासून लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. आलिया आणि रणबीर पंजाबी पद्धतीने लग्न करत असून लग्नानंतरच्या विधींसाठी आलिया आणि रणबीर काही दिवस कामातून १५ दिवसांचा ब्रेक घेणार आहेत.

रणबीर आणि आलिया चार वर्षांहून अधिक काळ रिलेशनशिपमध्ये आहेत. रणबीर आणि आलिया एकमेकांच्या कुटुंबांशी चांगले बाँडिंग शेअर करतात. रणबीरची आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा कपूर साहनी यांच आलियावर खूप प्रेम आहे. आलिया ही अनेकदा तिच्या सोशल मीडिया पोस्टवर  त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करताना दिसते.

लग्नानंतर रणबीर-आलिया मुंबईतील ‘ताजमहाल पॅलेस’मध्ये ग्रॅंड रिसेप्शन देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यात दोघांचे कुटुंब, मित्रांसह अनेक सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. या भव्य रिसेप्शनसाठी आलिया तिचा जवळचा मित्र मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला पोशाख परिधान करणार आहे.

रणबीर-आलिया लग्नानंतर लगेचच दोघेही त्यांच्या कामाला सुरुवात करणार आहेत. रणबीर 22 एप्रिलला मुराद खेतानीच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाच्या शुटिंगसाठी मनालीला जाणार आहे. रणबीर कपूरचे मनालीमध्ये हे दोन दिवसांचे शूट असेल, त्यानंतर तो  मुंबईत आठवडाभर शूटिंगमध्ये बिझी असेल.

Share