सातारा : संभाजीराजे छत्रपतींना राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याआधीच माघार घ्यावी लागली. मला तर वाटते की, त्यांचा गेम झाला. त्यांचा गेम कुणी केला, हे संभाजीराजेंना चांगलेच माहिती आहे, असे वक्तव्य भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केले आहे. छत्रपती घराण्यातील वंशजाचा महाविकास आघाडीने सन्मान राखायला हवा होता, असेही आ. शिवेंद्रराजे म्हणाले.
राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी अखेर या लढाईतून माघार घेतल्याचे जाहीर केले आहे. संभाजीराजे यांनी शुक्रवारी (२७ मे) सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आपली फसवणूक झाल्याचा आरोप केला. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिलेला शब्द पाळला नाही, घोडेबाजार होऊ नये म्हणून मी ही निवडणूक लढणार नाही; पण ही माघार नाही. हा माझा स्वाभिमान आहे, असे म्हणत आपण राज्यसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती की, त्यांनी मला दिलेला शब्द मोडला. स्वराज्य बांधण्यासाठी आता मी सज्ज झालो आहे. मावळ्यांना संघटित करण्यासाठी मी मोकळा झालो आहे. झालं ते बरं झालं, आता मी महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी मोकळा आहे. स्वराज्य संघटना बांधण्यासाठी आता राज्यभर फिरणार असल्याचे यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले.
दरम्यान, संभाजीराजेंच्या माघारीनंतर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अशातच भाजपचे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, संभाजीराजेंना राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याआधीच माघार घ्यावी लागली. मला तर वाटतंय त्यांचा गेम झाला. सर्वांनी ठरवून संभाजीराजे छत्रपतींचा गेम केला. त्यांच्या बाबतीत जे काही घडलं, कोणी घडवलं, हे सर्व संभाजीराजांना माहिती आहे. त्यांचा गेम कुणी केला, हे संभाजीराजेंना चांगलंच माहिती आहे, असे म्हणत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी शिवसेनेसह संभाजीराजेंना पाठिंबा न देणाऱ्या पक्षांवर नाव न घेता निशाणा साधला.
संभाजीराजेंच्या पाठीमागे महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज उभा
आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, मराठा समाजाने संभाजीराजेंच्या पाठीशी खंबीर उभे राहावे आणि छत्रपती संभाजीराजेंनीं मराठा समाजाच्या माध्यमातून राज्याचे नेतृत्व करावे. छत्रपती संभाजीराजे हे आमच्या छत्रपती कुटुंबातील आहेत. मी त्यांच्यापेक्षा छोटा आहे. मात्र, संभाजीराजांचे मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा आरक्षण यामध्ये फार मोठे काम आहे. त्यांनी समाजाला एकत्र ठेवण्याचे काम केले. यावेळी त्यांची खासदारकी गेली असेल; पण योग्य वेळी काय निर्णय घ्यायचा ते पारखून निर्णय त्यांनी घ्यावा. संभाजीराजेंच्या पाठीमागे महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज उभा आहे. त्यांच्या गडकिल्ले संवर्धनाचे काम, मराठा आरक्षण लढाईत त्यांचं योगदान अमूल्य आहे. अशावेळी छत्रपती घराण्यातील वंशजाचा महाविकास आघाडीने सन्मान राखायला हवा होता, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली.
छत्रपती संभाजीराजेंनी मराठा समाजाच्या माध्यमातून राज्याचे नेतृत्व करावे
संभाजीराजे छत्रपती यांनी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश येथे पोहोचून त्यांनी मराठा समाजात जागृती केली. समाजाला एकत्र ठेवण्याचे काम केले. संभाजीराजांच्या पुढील कारकिर्दीत मराठा समाजाने त्यांच्यासोबत रहावे. समाजासाठी स्थापन केलेल्या सकल मराठा संस्थेनेही त्यांच्या पाठीशी राहावे. कारण त्यांचे समाजासाठी फार मोठे योगदान आहे. छत्रपती संभाजीराजेंनी मराठा समाजाच्या माध्यमातून राज्याचे नेतृत्व करावे, असे मत आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केले.
संभाजीराजेंचा गेम झाला, गेम कुणी केला हे त्यांना माहिती आहे : आ. शिवेंद्रराजे भोसले