औरंगाबादेतही ‘द काश्मीर फाईल्स’ चे शो मोफत दाखविणार

औरंगाबाद : संपूर्ण देशात सध्या ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट मोठा चर्चेचा विषय आहे. या सिनेमाने आतापर्यंत १०० कोटींची कमाई केली आहे. भाजपशासीत काही राज्यात हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही हा चित्रपट करमुक्त करण्यात यावा अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. दरम्यान, औरंगाबादमधील भाजप नेते शिरीष बोराळकर यांनी नागरिकांच्या तिकिटांचा खर्च उचलण्याची घोषणा केली आहे. सिनेमाच्या १० शोचे मोफत आयोजन त्यांनी केले आहे.

श्रीवर्धन फाउंडेशनच्यावतीने रविवार, सोमवार आणि मंगळवार हे तीन दिवस ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे आयोजन करण्यात आले आहे. एकूण १० शो बुक करण्यात आले आहे. १९९० साली काश्मीरमध्ये हिंदूंवर जो अन्याय,अत्याचार झाला तो सर्वसामान्यांसमोर आला पाहिजे, हा यामागचा हेतू असल्याचं बोराळकर म्हणाले. तिकीटचे दर महाग असल्याने सर्वसामान्यांना ते पाहता येत नव्हते, म्हणून आम्ही ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट मोफत दाखवण्याचा निर्णय घेतला असल्याच बोराळकर म्हणाले.

Share