ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं निधन

मुंबई : ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे यांचं निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दूरदर्शनचे वृत्तनिवेदक यासह माध्यमतज्ज्ञ, संपादक, रंगकर्मी आणि लेखक अशी ओळख असलेल्या डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी काही काळ महाराष्ट्र शासनासाठीही काम केले होते. मुंबईतील मुलुंड पूर्व येथे डॉ. विश्वास मेहेंदळे यांच्या पार्थिवावर आज दुपारी मुलुंड येथेच अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

दिल्ली आकाशवाणीवरुन मराठी बातम्या वाचणारे विश्वास मेहेंदळे हे पहिले वृत्त निवेदक होते. त्यानंतर मुंबई दूरदर्शनचेही ते पहिले वृत्तनिवेदक होते. विश्वास मेहेंदळे यांनी मुंबई दूरदर्शन केंद्राचे संचालक म्हणूनही काम पाहिले आहे. केंद्र सरकारच्या सेवेतून मिळालेल्या प्रतिनियुक्तीत राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाचे ते संचालकही होते. तसेच, १८ हून अधिक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. याशिवाय अनेक नाटकांमध्ये भूमिकाही साकारल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत डॉ.विश्वास मेहंदळे यांना श्रद्धांजली वाहीली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे की,”दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक, ज्येष्ठ संपादक, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचे माजी संचालक तसेच प्रसिद्ध लेखक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. भावपूर्ण श्रद्धांजली.

Share