शरद पवारांची तब्येत बिघडली; उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर रुग्णालयात तीन दिवस उपचार केले जाणार आहेत. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे.

या संदर्भात राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी एक पत्र प्रसिद्ध केले आहे. यात ‘शरद पवार यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना ब्रिच कँडी रुग्णालयात पुढील तीन दिवस उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे, त्यांना २ नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज मिळेल.

त्यांचे पुढचे कार्यक्रम नियोजनाप्रमाणे होतील, असंही निवेदनात म्हटलं आहे. ३ नोव्हेंबर रोजी ते शिर्डी येथे येणार असून पक्षाच्या ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दोन दिवसीय शिबिरासाठी उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या आवारात गर्दी करू नये, असं आवाहनही या निवेदनाद्वारे करण्यात आलं आहे.

Share