थंडीत गरम पाण्याने अंघोळ करणे हानीकारक; हिवाळ्यात ‘अशी’ घ्या काळजी

थंडीच्या दिवसात गरम पाण्याने अंघोळ करायला लोकांना खूप आवडते. जेव्हा अंगाला बोचणारी थंडी पळवण्यासाठी गरम पाण्याने अंघोळ हा पर्याय बरेच जण निवडतात. तर काही जण असे असतात की गरमीच्या दिवसात ही कडक गरम पाण्याने अंघोळ करतात. मग गरम पाण्याने अंघोळ करण्याचे देखील तोटे आहेत हे माहित असणे खूप गरजेचे आहे.

लोक गरम पाण्याने अंघोळ करतात. मात्र संशोधनानुसार, गरम पाण्याचे तापमान ३२ डिग्री सेल्सिअसपर्यंत असणं गरजेचं आहे. जर त्याहून जास्त कडक गरम पाण्याने अंघोळ केल्यास त्वचा आणि केसांना हानी पोहोचू शकते.

गरम पाण्याने अंघोळ केल्यानं कसं तुमचं नुकसान होऊ शकते. या संबंधी १० गोष्टी खालीलप्रमाणे

१) जास्त तापमान असलेल्या गरम पाण्याने अंघोळ केल्यास त्वचेसाठी हानिकारक असते. यामुळे तुमची त्वचा लाल होते आणि अंगावर रॅशेज किंवा एलर्जी होऊ शकते.

२) गरम पाण्यामुळे त्वचा ड्राय होते. त्यामुळे अंगावर खाज येण्याची शक्यता जास्त असते.

३) गरम पाणी त्वचेतला ओलावा शोषून घेते. आपली त्वचा कोमल असते. गरम पाणी त्वचेवरील कोमलपणा नष्ट करते. त्यामुळे स्किन इन्फेक्शनसारखी समस्या उद्भवू शकते.

४) गरम पाण्यामुळे स्किनवरचे टीशूजला नुकसान होतं आणि ते डॅमेज होण्यास सुरूवात होते. त्यामुळे त्वचेवर वयाच्या आधी सुरकुत्या पडण्यास सुरूवात होते.

५) गरम पाण्यामुळे स्किनवरचं मॉश्चरायजर कमी होतं. त्यामुळे त्वचेवर ग्लो दिसत नाही.

६) गरम पाण्याने अंघोळ केल्यानं केसांवर वाईट परिणाम होतो. यामुळे केसांचे मॉश्चरायजर कमी होतं. केस रूक्ष आणि कोरडे दिसायला लागतात.

७) डोकं जर गरम पाण्याने धुतले तर टाळू कोरडं पडतं आणि त्यामुळे कोंड्याची समस्या उद्भवते.

८) गरम पाण्याने केस रूक्ष होतात आणि त्यामुळे केस गळायला सुरूवात होते.

९) गरम पाण्याने अंघोळ केल्यानं डोळ्यातील ओलावा देखील कमी होण्याची शक्यता असते. यामुळे डोळ्यात लालसरपणा, खाज आणि डोळ्यातून वारंवार पाणी येणे यासारख्या समस्या उद्भवतात.

१०) गरम पाण्याचा वाईट परिणाम हा हात आणि पायांवर देखील होतो. कडक गरम पाण्यामुळे नखं तुटणे, इंफेक्शन आणि नखांच्या बाजूची स्किन निघणे यासारखे प्रॉब्लम होण्याची शक्यता असते.

Share